राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला खेळाडूंचा भरघोस प्रतिसाद.
सिंधुदुर्ग.
जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या विशेष सहाकार्याने, नेहरू युवा केंद्र, व कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा दिनामित्त माणगाव, कुडाळ येथे क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला तालुक्यातील कॉलेज आणि विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. क्रीडा महोत्सव माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयाच्या क्रीडांगणावर संपन्न झाला.
स्पर्धेची सुरवात जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, एकनाथ केसरकर (सचिव माणगाव पं.शि. प्र मंडळ) उपमुख्याध्यापक संजय पिळनकर, कमलाकर धुरी, चंद्रकांत चव्हाण नेहरु युवा केंद्राचे विल्सन फर्नाडिस व कोकण चे व्यवस्थापक अजिंक्य शिंदे या मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन झाली.
कॉलजेच्या विद्यार्थ्यांनी मैदान गाजवत विद्यार्थ्यांनी खेळामध्ये चुणूक दाखवली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा मुलांमधील खेळाचे महत्व वाढावे या दृष्टिकोनातून आयोजित स्पर्धेमध्ये 100 मीटर धावणे हा खेळ प्रकार घेण्यात आला. स्पर्धेत प्रथम, व्दितीय, आणि तृतीय क्रमांच्या विजयी खेळाडूंना भारत सरकारच्या खेलमंत्रालयाचे प्रमाणपत्र व पदक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या सर्व खेळामध्ये प्रथमेश सावंत यांनी पंचाची भूमिका पार पाडली.
जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल मालवण या प्रशालेने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पालक क्रीडा दिन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दिवशी 50 मी व 100 मी. धावणे रस्सी खेच, कॅरम व डॉज बॉल या खेळाचे आयोजन करण्यात आले. न्यु इंग्लिश स्कुल ओरोस या प्रशालेने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 50 मी धावणे या खेळाचे आयोजन केले. या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजन करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये पालक, विद्यार्थींनी भरघोस प्रतिसाद दिला.
प्रास्ताविक समीर शिर्के यांनी केले, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस , एकनाथ केसरकर व संजय पिळनकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी कोकण संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक अजिंक्य शिंदे, अवंती गवस, समीर शिर्के, प्रदीप पवार, बाळकृष्ण शेळके व संस्थेचे स्वयंसेवकांनी तसेच दापोली कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले.