सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ जून पर्यंत ड्रोन वापरण्यास बंदी

सिंधुदुर्ग
ऑपरेशन सिंदूर च्या धर्तीवर खबरदारी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ जून पर्यंत कोणत्याही व्यक्तीस ड्रोन किंवा मानव रहित हवाई यंत्र चालवण्यास उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिले आहेत.ऑपरेशन सिंदूरच्या सैन्य दलाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धर्मस्थळ, पर्यटन स्थळे, लोक वस्ती असलेल्या ठिकाणी धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता तसेच सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे त्या ठिकाणी ड्रोन वापरण्यात येऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.