तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे चमकदार यश !
वेंगुर्ला
वेंगुर्ले नगर परिषदेच्या क्रीडांगणावर क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा पार पडल्या.या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांमध्ये कु. सोहम संतोष सावंत याने १०० मीटर धावणीत प्रथम क्रमांक मिळवला तर कु. आयुष शैलेश नार्वेकर याने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच १७ वर्षाखालील गटात २०० मीटर धावणीत कु. मिहिर राजेश राऊळ याने तृतीय क्रमांक मिळविला.अत्यंत आनंदाची बाब म्हणजे कु. सोहम संतोष सावंत यांची निवड पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
संस्थेचे उपाध्यक्ष श्री. इर्शाद शेख, संचालक श्री. प्रशांत नेरुरकर, सचिव श्री. दत्तात्रय परुळेकर, मुख्याध्यापिका सौ. मनीषा डिसोजा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

konkansamwad 
