टीम इंडियाची चौथ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक.

टीम इंडियाची चौथ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक.

मुंबई.

    टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२३ सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडवर ७० धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने या विजयासह वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी ३९८ धावांचं आव्हान दिलं होतं. मोहम्मद शमी याने सर्वाधिक 7 विकेट्स घेत न्यूझीलंडचं ४८.५ ओव्हरमध्ये  ३२७  धावांवर गारद केले. विराट कोहली , श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमी हे टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. तसेच टीम इंडियाची ही वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचण्याची चौथी वेळ ठरली.
        टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा याने ४७ धावा केल्या. शुबमन गिल याने नाबाद ८० धावा केल्या. शुबमनला क्रॅममुळे मैदान सोडावं लागलं. त्यानंतर शुबमन गिल शेवटच्या काही षटकांसाठी मैदानात आला आणि त्याने काही धावा जोडल्या. विराट कोहली याने ११३ बॉलमध्ये ११७ धावा केल्या.  श्रेयस अय्यर याने १०५ धावांची शतकी खेळी केली. विकेटकीपर केएल राहुलने ३९ धावांची नाबाद खेळी केली. तर सूर्यकुमार यादव १ रनवर आऊट झाला. न्यूझीलंडकडून टीम साऊथी याने ३ विकेट्स घेतल्या. तर ट्रेन्ट बोल्ट याने १ विकेट घेतली. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेल याने सर्वाधिक १३४ धावांची खेळी केली. कॅप्टन केन विलियमसन याने ६९ धावांचं योगदान दिलं. ग्लेन फिलिप्स ४१ धावांवर आऊट झाला. सलामी जोडी डेव्हॉन कॉनव्हे आणि रचिन रवींद्र या दोघांनी प्रत्येकी १३ धावा केल्या. टॉम लॅथमन हा शून्यावर बाद झाला. मिचेल सँटरने आणि टीम साऊथी या दोघांनी प्रत्येकी ९ धावा केल्या. तर टीम इंडियाकडून मोहम्मद शमी याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. शमीने सर्वाधिक ७ विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव या तिघांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.