वेंगुर्ला येथे १३ फेब्रुवारी पासून कोकण विभागीय महसूल क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा

वेंगुर्ला
वेंगुर्ले कॅम्प येथील तालुका संकुल येथे दि. १३ फेब्रुवारी पासून कोकण विभागीय महसूल क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२४-२५ चे आयोजन करण्यात आले आहे.राज्याचे मत्स्य मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. १३ ते १५ फेब्रुवारी असे तीन दिवस या स्पर्धा रंगणार आहे. याची जय्यत तयारी वेंगुर्ला कॅम्प मैदानावर सुरू आहे. या सोहळ्यास रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. नारायण राणे, आमदार श्री. निरंजन डावखरे, आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार श्री. दिपक केसरकर, आमदार श्री. निलेश राणे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. राजेश कुमार, कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी श्री. अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन श्री. राजेश देशमुख आणि श्री.अनिल पाटील यांनी केले आहे.