कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

कुडाळ
कुडाळ तालुक्यातील 68 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत आज कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कार्यालय मध्ये पार पडली. यामध्ये पुढील प्रमाणे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.
अनुसूचित जाती प्रवर्ग - रानबांबुळी, निरुखे
अनुसूचित जाती महिला - बांबुळी, वाडीवरावडे, आंबडपाल
अनुसूचित जमाती प्रवर्ग - आंब्रड
अनुसूचित जमाती महिला - एकही नाही.
नागरिकांचा मागास प्रवर्ग - घोटगे, वसोली, ओरोस बुद्रुक, हूमरमळा - वालावल, गोठोस, माड्याचीवाडी, पुळास, कसाल, करवडे तर्फ माणगांव
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - पावशी, मांडकुली, हूमरमळा-अणाव, पिंगुळी, निवजे, नानेली, माणगाव, गोवेरी, तुळसुली कर्याद नारूर
खुला प्रवर्ग - भरणी, भडगाव बुद्रुक, नारुर कर्याद नारुर, गावराई, सरंबळ, तेर्सेबांबर्डे, कुपवडे, वेताळ बांबर्डे, बिबवणे, हिर्लोक, कालेली, करवडे कर्याद नारूर, घावनळे, परबवाडा पाट, सोनवडे तर्फ कळसुली, वाडोस, नेरूर कर्याद नारुर, साळगांव, आवळेगाव -ओरोस खुर्द, डिगस, कवठी, सोनवडे तर्फ हवेली
खुला प्रवर्ग महिला - तेंडोली, वालावल, आंदुर्ले, झाराप, चेंदवण, पणदूर, पोखरण-कुसबे, हुमरस, कुंदे, मुळदे, पांग्रड, तुळसुली तर्फ माणगांव, शिवापूर, पडवे, कडावल, आकेरी, बाव, वर्दे, गिरगाव - कुसगाव, अणाव, जांभवडे, नेरूर देऊळवाडा
अशा प्रकारे एकूण कुडाळ तालुक्यातील 68 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली असून त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.