परुळे श्री देव आदिनारायण मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.

परुळे श्री देव आदिनारायण मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.

 

     श्री देव आदिनारायण देवस्थान परुळे यांनी श्री सूर्य पंचायतन याग आणि श्री दत्त पुराण कथा ज्ञानयज्ञ आयोजित केला आहे. सकल विश्व कल्याणार्थ, देवधर्म कार्यात नेहमीच तत्पर असलेल्या श्री देव आदिनारायण देवस्थान परुळे यांच्या वतीने पौष शुद्ध द्वितीया बुधवार दिनांक १ जानेवारी ते पौष शुद्ध षष्ठी रविवार दिनांक ५ जानेवारी २०२५ या कालावधीत सकाळच्या सत्रात भगवंताची यज्ञ सेवा घडावी म्हणून श्री सूर्य पंचायतन याग आणि संध्याकाळच्या सत्रात भगवंताची ग्रंथ सेवा घडावी म्हणून श्री दत्त पुराण कथा प्रवचन मालेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर निरुपण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निरुपणकार ह.भ.प.श्री प्रणव बुवा गोखले, पुणे यांच्या सुमधुर रसाळ वाणीतून होणार आहे.
       अग्नीचा वापर करून आपण जे काही कर्म करतो त्याला यज्ञ असे म्हणतात. मग तो समिधा आदीचा वापर करून देवतांच्या कृपेसाठी जो केला जातो त्याला यज्ञ किंवा याग असे म्हणतात. आपण आपल्या शरीरातील अग्नीचा वापर करून नामस्मरण करतो त्याला जपयज्ञ म्हणतात. कथा निरुपण, प्रवचन, कीर्तन याला ज्ञानयज्ञ म्हणतात. आपण भोजन करतो त्यालाही यज्ञकर्मच म्हणतात. या धार्मिक कार्यक्रमांना ग्रामस्थांनी हजेरी लावली आहे व निरुपण चा आनंद घेत आहेत..