सागरतीर्थ ग्रामपंचायतीच्या नाकासमोर होते सुरूच्या झाडांची अवैध वृक्षतोड.

सागरतीर्थ ग्रामपंचायतीच्या नाकासमोर होते सुरूच्या झाडांची अवैध वृक्षतोड.


वेंगुर्ला
     वेंगुर्ला तालुक्यातील सागरतीर्थ ग्रामपंचायत हद्दीतील समुद्रकिनारी तीन वर्षांपूर्वी सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सुरूच्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. सदर सुरूच्या झाडांची गेले दहा ते बारा दिवस जोरदार कत्तल सुरू असून सदर झाडांच्या फांद्या मंडप डेकोरेटर्स आणि मंगल कार्यालयातील डेकोरेशन साठी वापर होत असल्याचे समजते. सागरतिर्थ ग्रामपंचायती पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावरील सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सुरूच्या झाडांची कत्तल बेसुमार रित्या चालू आहे.
       याबाबत ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी पदाधिकारी यांनी सदर वृक्षतोडीकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी स्थानिक पर्यावरण प्रेमीन कडून होत आहे.