पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या मोहम्मदला गुजरातमध्ये अटक. गुजरात एटीएसची कारवाई.

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या मोहम्मदला गुजरातमध्ये अटक.  गुजरात एटीएसची कारवाई.

गुजरात.

   गुजरात दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) रविवारी मोठं यश मिळाले आहे.पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या एका व्यक्तीला गुजरात एटीएस पथकाने अटक केली आहे.मोहम्मद सकलेन असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो गुजरातमधील जामनगर येथील रहिवासी आहे.
   मोहम्मद सकलेनने भारतीय सिमकार्ड खरेदी करून त्यावर व्हॉट्सॲप ॲक्टिव्हेट केले होते. हा व्हॉट्सॲप क्रमांक पाकिस्तानमध्ये सक्रिय होता. जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांच्या विरोधात हेरगिरी करण्यासाठी या क्रमांकाचा वापर केला जात होता आणि याची गोपनीय माहिती पाकिस्तानला लीक केली जात होती.दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गुजरात एटीएसने या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता आणि काही आरोपींना अटक करण्यात आली होती.यामध्ये मोहम्मद सकलेन हा फरार होता.अखेर मोहम्मदला गुजरात एटीएसने अटक केली आहे.
   गुजरात एटीएसला मिलिटरी इंटेलिजन्सकडून इनपुट मिळाले होते की, पाकिस्तानी एजन्सीचा एक गुप्तहेर भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या फोनवर संशयास्पद लिंक्स (मालवेयर व्हायरस) पाठवत आहे, त्यांचा फोन डेटा हॅक करत आहे आणि भारतीय सैन्याची गुप्त माहिती लीक करत आहे. यानंतर गुजरात एटीएसने या क्रमांकाची चौकशी केली असता हा क्रमांक जामनगर येथील मोहम्मद सकलेन याच्या नावाने नोंद असल्याचे समोर आले.अखेर मोहम्मद सकलेनच्या गुतजरात एटीएसने अटक केली आहे.