दुर्ग मावळा प्रतिष्ठान आणि चाफेड ग्रामस्थांच्या वतीने दुर्गाचा डोंगर येथे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम.
देवगड.
दुर्ग मावळा प्रतिष्ठान आणि चाफेड ग्रामस्थ यांच्या वतीने चाफेड येथे स्थित ऐतिहासिक दुर्गाचा डोंगर येथे संवर्धन व स्वच्छता मोहीम रविवारी राबविण्यात आली.चाफेड येथील दुर्गाचा डोंगर या ऐतिहासिक ठिकाणी चाफेड ग्रामस्थ तसेच दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे संवर्धन कार्य सुरु असून गेल्याच महिन्यात संवर्धन मोहीम आयोजित करण्यात आलेली होती. त्या मोहिमेत दुर्गाच्या डोंगरावरील चाळीस बाय चाळीस व चाळीस फूट खोल चौकोनी विहिरीची स्वच्छता करण्यात आली होती.राबविण्यात आलेल्या मोहिमेत डोंगराच्या दक्षिणेकडे असलेल्या गोल विहिरीच्या सभोवताली वाढलेली झाडी झुडूपे स्वच्छ करण्यात आली. तसेच राजवाडा आणि छोट्या चौकोनी विहिरीची स्वच्छता करण्यात आली.
या संवर्धन मोहिमेला चाफेड सरपंच किरण मेस्त्री, गणेश नाईक, समिल नाईक, शिवाजी परब, प्रसाद पेंडूरकर, लक्ष्मण फोफळे, हेमालता जाधव, पंढरीनाथ कांडर, प्रविण नाईक, अमित कदम आदी मावळ्यांनी सहभाग घेतला. या मोहिमेला अल्पोपाहराची सोय हेमलता जाधव यांनी केली.