वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत गणेशोत्‍सव कालावधीमध्‍ये घेण्यात आलेल्या स्पर्धांचे निकाल जाहीर.

वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत गणेशोत्‍सव कालावधीमध्‍ये घेण्यात आलेल्या स्पर्धांचे निकाल जाहीर.
वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत गणेशोत्‍सव कालावधीमध्‍ये घेण्यात आलेल्या स्पर्धांचे निकाल जाहीर.

वेंगुर्ला.

  माझी वसुंधरा अभियान ४.० व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत गणेशोत्‍सव कालावधीमध्‍ये शहरातील नागरीकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्‍यात आलेले होते.पर्यावरण पूरक सण साजरे करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच हानिकारक रंगांचा,पीओपी मूर्तीचा वापर थांबवण्यासाठी व आपल्या पारंपरिक पद्धतींचा अवलंब करुन पर्यावरणाचे जतन  व संवर्धन करण्‍याच्‍या दृष्टीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
   वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत  विदयार्थ्‍यांसाठी १६ वर्षापर्यंत व १६  ते २१ वर्षापर्यंत अशा  दोन  वयोगटामध्‍ये इको  फ्रेंडली बाप्‍पा स्पर्धा २०२३ आयोजित करण्‍यात आलेली होती.  या स्पर्धेसाठी विदयार्थ्‍यांनी नैसर्गिक मातीपासून, नैसर्गिक रंगाचा वापर करुन १५ से.मी. पेक्षा मोठी मूर्ती बनविणे अनिवार्य होते. मूर्ती बनवितानाचे फोटो तसेच व्हिडीओ वेंगुर्ला  नगरपरिषदेच्या सोशल मिडीया लिंकवर पाठविणे आवश्‍यक होते. या स्पर्धेमध्‍ये शहरातील विदयार्थ्‍यांनी मोठया संख्‍येने सहभाग घेतला होता. इको  फ्रेंडली बाप्‍पा स्पर्धा २०२३ चा  निकाल पुढीलप्रमाणे आहे. प्रथम क्रमांक – ओंकार तेंडोलकर, द्वितीय क्रमांक – मकरंद वेंगुर्लेकर, तृतीय क्रमांक – सर्वेश मेस्‍त्री.
    तसेच वेंगुर्ला नगरपरिषेमार्फत शहरातील नागरीक तसेच गणेश मंडळांसाठी  पर्यावरण संवर्धनाला चालना देणा-या नाविन्‍यपूर्ण कल्पनांना प्रोत्‍साहन देण्‍यासाठी पर्यावरण पूरक गणेश सजावट स्‍पर्धा २०२३ आयोजित करण्‍यात आलेली होती. या स्पर्धेमध्‍ये गणेश सजावटीसाठी नैसर्गिक व इको  फ्रेंडली सामग्री वापरणे बंधनकारक होते तसेच थर्माकोल व सिंगल युज प्‍लॅस्‍टीक वापरण्‍यास मनाई होती.गणेश सजावटीचे फोटो तसेच व्हिडीओ वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सोशल मिडीया लिंकवर पाठविणे आवश्‍यक होते.स्पर्धेमध्‍ये शहरातील नागरिकांनी मोठया संख्‍येने सहभाग घेतला होता. पर्यावरण पूरक गणेश सजावट स्‍पर्धा २०२३ चा  निकाल पुढीलप्रमाणे आहे. यामध्ये प्रथम क्रमांक  हिमेश हर्षल पालव यांने पटकावला असून त्यांने प्लास्टिक व थर्माकोल चा वापर न करता बांबू चा वापर करून सजावट केली. या स्पर्धेमध्ये दि्वतीय क्रमांक श्वेता विनायक गवंडळकर हिने पटकवला आहे.तिने कुड्याच्या पानापासून तयार केलेल्या पत्रावळ्या व द्रोण यांचा वापर करून सजावट केली. तर तृतीय क्रमांक भगवान र. धावडे यांनी पटकवला.यांनी सुतळीचा वापर करून सजावट केली.
   वेंगुर्ला नगरपरिषदे मार्फत आयोजित सदर स्पर्धेतील विजेत्यांना पुढीलप्रमाणे बक्षीस देण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकासाठी रु.5555/-, द्वितीय क्रमांकासाठी रु. 3333/- आणि तृतीय क्रमांकासाठी रु.2222/- तसेच सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.या स्पर्धांसाठी वेंगुर्ला नगरपरिषदेचे स्वच्‍छता ब्रॅंड ॲम्बेसेडर प्रा. सुनिल नांदोसकर, पर्यावरण दूत डॉ. धनश्री पाटील यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.  या स्पर्धेमध्‍ये सहभागी स्पर्धकांचे मुख्‍याधिकारी परितोष कंकाळ यांनी आभार व्‍यक्‍त केले तसेच विजेत्‍यांचे अभिनंदन करुन त्‍यांच्‍या भावी वाटचालीसाठी शुभेच्‍छा दिल्‍या. या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत स्वच्‍छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान या बाबत जनजागृती करण्यासाठी अशा प्रकारे विविध उपक्रम राबविण्‍यात येणार असून शहरवासियांनी वेंगुर्ला शहराचा नावलौकिक वाढविण्‍यासाठी अशाच प्रकारे उत्स्फूर्तपणे सहकार्य करावे असे आवाहन मुख्‍याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले.