मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले; कोकणकन्या एक्स्प्रेस, तुतारी एक्स्प्रेस दोन ते चार तास उशिराने.
मुंबई.
कोकणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले आहेत. अनेक ठिकाणी ट्रॅकवर पाणी साचल्याने या मार्गावरील अनेक गाड्या या विलंबाने धावत आहेत. कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेससह आणखी काही एक्सप्रेस गाड्या या २ ते चार तास उशिराने धावत आहेत. तर काही गाड्या या मध्येच थांबवण्यात आल्या आहेत.
कोकणात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे. आजदेखील रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने कोकणासह वरील जिल्ह्यांना रेड अर्लट दिला आहे. मुंबई व ठाण्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
या पावसामुळे कोकण रेल्वेवर परिमाण झाला आहे. पावसामुळे काही ठिकाणी ट्रॅकवर पाणी साठले आहेत. तर काही ठिकाणी ट्रॅक खालील भरावा वाहून गेला आहे. यामुळे या मार्गाने धावणाऱ्या काही गाड्या या रद्द तर काही गाड्या या संथ गतीने पुढे जात आहेत. काही गाड्यांना पाच ते सात उशीर झाला आहे. कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेससह आणखी काही एक्सप्रेस गाड्या या २ ते चार तास उशिराने धावत आहेत. तर काही गाड्या या मध्येच थांबवण्यात आल्या आहेत. मुंबईच्या दिशेने जाणारी निजामुद्दीन एर्नाकुलम एक्सप्रेस सहा ते सात तास उशिराने धावते. तर इतर गाड्या अर्धा ते एक तासाने उशिराने धावत आहेत.