हायवे संबंधी प्रलंबीत प्रश्नांबाबत परशुराम उपरकर व त्यांच्या समर्थकांकडून आरटीओ कार्यालयात पुन्हा बैठक
सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आर.टी.ओ. कार्यालयात माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर व त्यांच्या समर्थकांची हायवेशी संबंधी प्रलंबीत प्रश्नांबाबत पुन्हा बैठक घेण्यात आली. मागील बैठकीत पंधरा दिवसांचे अल्टीमेटम कारवाईसाठी परिवहन अधिकारी यांना देण्यात आला होता त्यानंतर काही प्रमाणात कारवाई झाली देखील मात्र पुन्हा त्याकडे दुर्लक्ष करण्यात आला असे उपरकर म्हणाले.आंबोली, फोंडा घाटामध्ये ओव्हरलोड वाहतूक सुरुच आहे त्यामुळे अपघातही झाले.हायवेवर आपत्कालीन बोर्ड, रुग्णवाहिका, मदत नंबर फलक,हायवे दिशादर्शक फलक,लक्झरी बस मधुन बेकायदा होणारी मालवाहतूक आदी अनेक मागण्या करुनही सिंधुदुर्ग आर.टी.ओ. विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले असे उपरकर म्हणाले.तर हायवेचे अनेक प्रश्न आजही बाकी आहेत ठेकेदारावर कोणतीही कारवाई झालेली नाही.अवैध प्रवासी वाहतूक,ओव्हरलोड वाहतूक याकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घ्यावी लागेल असे त्यानी सांगितले. येत्या 15 दिवसांत योग्य ती कारवाई केली जावी हा शेवटचा अल्टीमेटम असून त्यानंतर पुढील पाउल उचलले जाईल. पुन्हा एकदा गाड्या अडवून अनधीकृत वाहतूक दाखवू असा इशारा उपरकर यांनी दिला. यावेळी आरटीओ प्रादेशिक परिवहन विभागाकडून याप्रश्नी महामार्ग पोलीस, परिवहन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, हायवेचे अधिकारी यांची येत्या २३ रोजी बैठक आयोजित केली आहे. त्यात याबाबत योग्य ती चर्चा केली जाईल तसेच सबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देखील यावेळी देण्यात आले.
यावेळी आशिष सुभेदार,आप्पा मांजरेकर, राजेश टंगसाळी बाळा बहिरे, नाना सावंत, सचिन मयेकर, विजय जांभळे, स्वप्नील जाधव, मंदार नाईक, आबा चिपकर, रमेश शेळके, बाबल घाटकर, शिवा तानावडे आदींसह उपरकर समर्थक उपस्थित होते.