सातार्डा येथे महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान.
सावंतवाडी.
तालुक्यातील सातार्डा - तरीचावाडा येथे महिला दिनाचे औचित्य साधून सातार्डा पंचक्रोशीतील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालय मंडळ व श्रीराम प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्री देव महापुरुष मंदिरात करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने जि.प.च्या माजी महिला बालकल्याण सभापती सौ शर्वाणी शेखर गावकर, सातार्डा सरपंच संदीप प्रभू,कवठणी सरपंच अजित कवठणकर,टिळक ग्रंथालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मांजरेकर, पोलीस पाटील सौ.विनिता मयेकर, श्रीराम प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष तथा पत्रकार संजय पिळणकर, निवृत्त शिक्षिका सौ समिधा मांजरेकर, गजानन शिरसाट,ग्रा पं सदस्य सौ शर्मिला मांजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी कर्तृत्ववान महिला म्हणून सातार्डा गावच्या माजी सरपंच श्रीमती राजश्री रवींद्र भगत, कवठणी गावच्या उद्योजिका सौ स्वप्ना संतोष कवठणकर, सातोसे गावच्या अंगणवाडी मदतनीस श्रीमती तनुजा तुळशीदास गडेकर, साटेली गावच्या उद्योजिका सौ नम्रता नंदकिशोर झारापकर व किनळे गावच्या सौ आनंदी भिकाजी जोशी यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
यावेळी सौ समिधा मांजरेकर यांनी जागतिक महिला दिनाबाबत सविस्तर माहिती दिली.तसेच ग्रंथालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मांजरेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच सातार्डा सरपंच संदीप प्रभू, कवठणी सरपंच अजित कवठणकर यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत कौतुक केले.या कार्यक्रमाचे पुरस्कर्ते संजय पिळणकर यांनी मनोगत व्यक्त करतांना ग्रंथालय ५० व्य वर्षात पदार्पण करत असल्याने हे वर्ष सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करावे व वर्षभर नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करावे त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा प्रयत्न करेन असे सांगितले.तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रंथालयाचे कार्यवाह पांडुरंग हळदणकर,ग्रंथपाल संजय कवठणकर,लिपिक सौ उत्कर्षा आरोंदेकर,कर्मचारी रवींद्र कवठणकर यांचे विशेष आभार मानले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ शर्वाणी गावकर यांनी आजची महिला व तिच्यासमोर असलेली आव्हाने याबाबत मार्गदर्शन करून जरी यावेळी पंचक्रोशीतील ५ महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला तरी उपस्थित सर्वच महिला या कर्तृत्ववान महिला असल्याचे सांगितले.