वागदे येथे निवासी धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

वागदे येथे निवासी धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.


कणकवली.
          त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहाय्यगण सिंधुदुर्ग तथा त्रिरत्न बौद्ध महासंघ सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने कणकवली येथील कै. गणपतराव सावंत बहुउद्देशीय सभागृह वागदे या ठिकाणी दि.१ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदरच्या शिबिराचे नेतृत्व आदरणीय धम्मचारी अनोमकीर्ती ( पुणे) हे करणार आहेत.या शिबिरात ‘त्रिरत्न वंदना’ या विषयावर अभ्यास होणार आहे.बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील नवासमाज व त्या नवसमाजावर आधारित असा बौद्ध धम्म भारतात निर्माण व्हावा यासाठी तथागत भगवान बुद्धांच्या सन्मार्गावर आरुढ होऊन आचरणशील बौद्ध समाज निर्माण करण्याच्या सदहेतूने धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पाली पूजा वंदना,ध्यान सराव, धम्म अभ्यास गटचर्चा, संपर्क सराव, प्रश्नोत्तरे इत्यादीद्वारे धम्म सखोलपणे जाणून घेण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन केले जाणार आहे. या धम्म प्रशिक्षण शिबिरात आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे व धम्म प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन त्रिरत्न बौद्ध महासंघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने करण्यात आले आहे.