मालवण येथे १३ सप्टेंबर रोजी लहान मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

मालवण येथे १३ सप्टेंबर रोजी लहान मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

 

मालवण
   

       मालवण शहरातील बाजारपेठ येथील श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि अंकुर हॉस्पिटल, झाट्ये क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान मंदिर येथे १३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ६ यावेळेत १८ वर्षाखालील लहान मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात गरजू व्यक्तींना मोफत औषधे देखील दिली जातील.  यासोबतच सर्व वयोगटातील लोकांसाठी आयुष्यमान कार्ड देखील मोफत काढून दिले जाईल. या संधीचा लाभ घेऊन आपल्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तसेच आयुष्मान कार्ड काढण्यासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.