वेंगुर्ला नगरपरिषद मध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
वेंगुर्ला.
वेंगुर्ला नगरपरिषदेमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्त वेंगुर्ला नगरपरिषदेच्या क्रॉफर्ड मार्केट (जुनी प्रशासकीय इमारत) येथे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी वेंगुर्ला नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर,उमेश येरम तसेच वेंगुर्ला नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कर्मचारी उपस्थित होते. यानंतर वेंगुर्ला नगरपरिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये मान्यवरांच्या हस्ते नगरपरिषदेच्या स्वच्छतेमध्ये उत्कृष्ट काम करणा-या सफाई कर्मचारी यांना प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. तसेच वेंगुर्ला शहरास कचरामुक्त शहर बनविण्यासाठी नियमितपणे सहकार्य करणा-या स्वाती बेस्ता व माझा वेंगुर्लाचे अध्यक्ष शेटये यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वेंगुर्ला नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगरसेवक उमेश येरम यांनी आपले मनोगत व्यक्त करुन नगरपरिषदेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. वेंगुर्ला नगरपरिषदेचे सर्व अधिकारी/कर्मचारी व सफाई कर्मचारी यांच्या अथक परिश्रमामुळे वेंगुर्ला नगरपरिषदेचे नाव राज्यात तसेच देश पातळीवर झळकत आहे. राज्यातील सर्वात जुन्या नगरपरिषदांपैकी एक असणा-या वेंगुर्ला नगरपरिषदेस विविध क्षेत्रात अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. सफाई कर्मचा-यांचे अमूल्य योगदान विचारात घेवून त्यांच्यासाठी नगरपरिषदेमार्फत विविध लाभदायी योजना लागू करण्यात आलेल्या आहेत. आगामी काळात वेंगुर्ला नगरपरिषदेस १५० वर्षे पूर्ण होणार असून त्यानिमित्त यापेक्षा उज्वल यश प्राप्त करुन देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करुन वेंगुर्ला नगरपरिषदेचे नाव उज्वल करु असे मनोगत मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी व्यक्त केले. तसेच वेंगुर्ला शहराचा मुख्य जलस्त्रोत निशाण तलाव (अमृत सरोवर) येथे मुख्याधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी वेंगुर्ला नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, प्रशांत आपटे तसेच वेंगुर्ला नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कर्मचारी उपस्थित होते. यानंतर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागामार्फत वेंगुर्ला शहरात फायर बुलेट आणि अग्निशमन वाहनाद्वारे संचलन करण्यात आले.