मधुकर मातोंडकर यांना मुंबई एकता कल्चरल अकादमीचा सांस्कृतिक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर.
कणकवली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या साहित्य- सांस्कृतिक - सामाजिक क्षेत्रात गेली 40 वर्ष महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या कवी मधुकर मातोंडकर यांना मुंबई एकदा कल्चरल अकामीचा महात्मा ज्योतिबा फुले स्मृती सांस्कृतिक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाला आहे. 13 जानेवारी रोजी मुंबई गिरगाव साहित्य संघ येथे ज्येष्ठ अभिनेते अशोक समेळ यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या एकता कल्चरल महोत्सवात श्री मातोंडकर यांना सदर पुरस्काराने ज्येष्ठ गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.यासाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांनी काम पाहिले.
एकता कल्चरल मुंबई संस्था गेली पस्तीस वर्षे संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्य कला संगीत नृत्य अभिनय या क्षेत्रातील गुणवंत कलाकारांना गौरवित असते. यात निष्ठेने सांस्कृतिक काम करणाऱ्या परंतु प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या कार्यकर्त्यांचा शोध घेऊ त्यांना दरवर्षी महात्मा ज्योतिबा फुले स्मृती पुरस्कार देऊ सन्मानित करते. यावर्षीच्या या पुरस्कारासाठी गेली 40 वर्ष तळकोकणात सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मधुकर मातोंडकर यांची एक मताने निवड करण्यात आली.