मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन.

सिंधुदुर्ग.

   मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने जिल्हा ग्रंथालय येथे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव ए. बी. कुरणे या उपस्थित होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय येथे उपस्थित वाचक वर्ग व विद्यार्थी यांना ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या अनमोल ग्रंथांची माहिती देण्यात आली. व्यक्तीच्या विकासामध्ये ग्रंथांचा महत्वाचा वाटा असून सुजान नागरीक घडण्यासाठी ग्रंथ वाचन व अध्ययन खुप महत्वाचे असल्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी सांगितले.
   जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव ए. बी. कुरणे यांनी ग्रंथ हे आपले गुरु, मार्गदर्शक व मित्र असल्याचे सांगून ग्रंथ वाचनासाठी सर्वांना प्रोत्साहित केले. त्यांनी पुढे असे सांगितले की, "राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' दि. 14 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो. मराठी भाषेच्या वापरांबाबत जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे व प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालये/सार्वजनिक उपक्रम यांनी मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य आहे,असे त्या म्हणाल्या.