परुळे येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

वेंगुर्ला
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी संशोधन विद्यापीठ दापोली प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले व ग्रामपंचायत परुळे बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक फलोद्यान विकास अभियान अंतर्गत मसाला पिके उत्पादन, तंत्रज्ञान व प्रक्रिया अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम परुळे बाजार येथे संपन्न झाला यावेळी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र एल. एस खापरे कनिष्ट प्रजनन शास्त्रज्ञ एस. एस. भुरे, वरीष्ठ संशोधन सहाय्यक गोपाळ गोलवनकर, एस एस. म्हापसेकर, सरपंच महेश सामंत ग्रामपंचायत सदस्य प्रदीप प्रभू. प्राजक्ता पाटकर चीपी उपसरपंच प्रकाश चव्हाण, चेअरमन चेतन सामंत, परुळे माजी सरपंच पुरुषोत्तम प्रभू , कृषी सहाय्यक सूरज परब आदींसह शेतकरी वर्ग उपस्थित होते यावेळी शेतकर्यांना मसाला पिक उत्पादन करण्या संदर्भात तंत्रज्ञान व प्रक्रिया तसेच किड रोग उपाय याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उपस्थित शेतकऱ्यांना लवंग व मिरी या रोपांचे वाटप करण्यात आले.