वेंगुर्ला भाजपा च्या वतीने ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा.

वेंगुर्ला भाजपा च्या वतीने ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा.

वेंगुर्ला.

   ख्रिस्ती धर्मियांच्या नाताळ सणाचे औचित्य साधून भाजपाच्या वतीने वेंगुर्ला तालुक्यात ख्रिस्ती बांधवांना नाताळ च्या शुभेच्छा देण्यात आल्या. 
   विविधतेने नटलेल्या आपल्या देशात सर्वधर्मीय लोक गुण्यागोविंदाने राहतात आणि सर्वधर्मीयांचे उस्तव - सण मोठ्या उस्ताहाने साजरे केले जातात.ख्रिस्ती धर्मीयांचा नाताळ अर्थात ख्रिसमस हा यापैकी एक सण नाताळ मुलत: प्रेमाचा संदेश देणारा सण आहे.या नाताळ सणानिमित्त भाजपा जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस, अल्पसंख्याक सेलचे ता.अध्यक्ष सायमन आल्मेडा, परबवाडा माजी सरपंच ईनासीन फर्नांडिस व उभादांडा माजी सरपंच ईलीहास फर्नांडिस यांच्या निवासस्थानी जाऊन भाजपा प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
   यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, मा.नगराध्यक्ष राजन गिरप, जि.का.का.सदस्य वसंत तांडेल, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब, सांस्कृतिक आघाडीचे शैलेश जामदार, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, आसोली उपसरपंच संकेत धुरी, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, मारुती दोडशानट्टी, सोशल मिडीयाचे अमेय धुरी, बुथप्रमुख रविंद्र शिरसाठ व बाळा मळगांवकर, सत्यवान परब, संतोष सावंत, चैतन्य दळवी, ओंकार चव्हाण इत्यादी उपस्थित होते.