नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा घेतली देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी दिली शपथ.

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा घेतली देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी दिली शपथ.

नवीदिल्ली.

   नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर सलग तिसऱ्यांदा देशातील सर्वोच्च पदाची शपथ घेणारे पंतप्रधान मोदी हे पहिले नेते आहेत. राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर राजनाथ सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यानंतर अमित शाह आणि चौथ्या क्रमांकावर नितीन गडकरी यांनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. याशिवाय भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. ते म्हणाले आहेत की, सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याबद्दल नरेंद्र मोदीजींचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. पंतप्रधानांच्या सक्षम नेतृत्वाखाली देश विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल आणि बिहारच्या विकासाला पूर्ण सहकार्य मिळेल.

पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री पुढीलप्रमाणे-

   राजनाथ सिंह, अमित शाह, नितिन गडकरी, जेपी नड्डा, शिवराज सिंह चौहान, निर्मला सीतारमण, सुब्रह्मण्यम जयशंकर, मनोहर लाल, हरदनहल्ली देवगौड़ा कुमारस्वामी, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, जीतन राम मांझी, राजीव रंजन सिंह, सर्बानंद सोनोवाल, डॉ. वीरेंद्र कुमार, राममोहन नायडू, प्रल्हाद जोशी, जुएल ओरांव, गिरिराज सिंह, अश्वनी वैष्णव, ज्योतिरादित्य माधवराव सिंधिया, भूपेंद्र यादव, गजेन्द्र सिंह शेखावत, अन्नपूर्णा देवी, किरेन रिजिजू, हरदीप सिंह पुरी, डॉ मनसुख मंडाविया, जी किशन रेड्डी, चिराग पासवान, सीआर पाटील, राव इंद्रजीत सिंह.

पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्री पुढीलप्रमाणे -

  जितेंद्र सिंह, अर्जुन राम मेघवल, प्रतापराव जाधव, जयंत चौधरी, जितिन प्रसाद, श्रीपाद यशो नाईक, पंकज चौधरी, कृष्णपाल गुर्जर, रामदास आठवले, रामनाथ ठाकुर, नित्यानंद राय, अनुप्रिया पटेल, वी सोमन्ना, चंद्रशेखर पेम्मासानी, एसपी सिंह बघेल,शोभा करांदलाजे, कीर्तिवर्धन सिंह, बनवारी लाल वर्मा, शांतनु ठाकुर, सुरेश गोपी, एल मुरुगन, अजय तमटा, बंडी संजय कुमार, कमलेश पासवान, भागीरथ चौधरी, सतीशचंद्र दुबे, संजय सेठ, रावनीत सिंह बिट्टू, दुर्गादास उइके, रक्षा निखिल खडसे, सुकांता मजूमदार, सावित्री ठाकुर, तोखन साहू, डॉ राजभूषण निषाद, भूपतिराजू श्रीनिवास वर्मा, हर्ष मल्होत्रा, निमुबेन जयंतीभाई बांभानिया, मुरलीधर मोहोळ, जॉर्ज कुरियन.