कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला भाजपाच्या वतीने माजी सैनिक ऑनररी सुभेदार मेजर पुंडलिक धर्णे यांचा सन्मान.

कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला भाजपाच्या वतीने माजी सैनिक ऑनररी सुभेदार मेजर पुंडलिक धर्णे यांचा सन्मान.

वेंगुर्ला.

   भारतीय सैन्याच्या शौर्याची आणि त्यागाची आठवण म्हणजेच " कारगिल विजय दिन " होय. या दिनाचे औचित्य साधून भाजपा च्या वतीने ऑनररी सुभेदार मेजर पुंडलिक द्वारकानाथ धर्णे यांचा सत्कार करण्यात आला.३० वर्षे सेवा बजावलेल्या पुंडलिक धर्णे यांनी ऑपरेशन रक्षक, ऑपरेशन पराक्रम ऑपरेशन विजय यामध्ये सहभागी झाले होते.

   भारतीय सैन्यदलाप्रती गौरवशाली भावनांमध्ये भर घालणाऱ्या भारतमातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या प्रत्येक जवानाला मानवंदना आणि कारगिल युद्धात जिवाची बाजी लावलेल्या शुर विरांना नमन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
   २५ वर्षांपूर्वी म्हणजेच २६ जुलै १९९९ रोजी २३००० फुट उंचीवर ६० दिवस चाललेल्या या घनघोर युद्धात आजच्या दिवशी भारतीय सैन्याने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. २ लाख भारतीय सैन्य कारगिल मध्ये होते.५२७ जवान शहीद झाले तर १४०० जवान जखमी झाले. ह्या दिवसाची आठवण म्हणून कारगिल दिन देशभर साजरा केला जातो.
   यावेळी माजी नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या हस्ते ऑनररी सुभेदार मेजर पुंडलिक द्वारकानाथ धर्णे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
   यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस, मच्छिमार नेते दादा केळुसकर, महीला मोर्चा शहर अध्यक्षा श्रेया मयेकर, रसिका मठकर, अल्पसंख्याक सेलच्या हसिनाबेन मकानदार, ब्राह्मण समाजाचे श्रीकांत रानडे उपस्थित होते.