वेंगुर्ला येथे उद्या स्विफ्ट लेटची साद भारतीय स्विफ्ट लेटच्या गुढ विश्वाची सफर कार्यक्रमाचे आयोजन.

वेंगुर्ला येथे उद्या स्विफ्ट लेटची साद भारतीय स्विफ्ट लेटच्या गुढ विश्वाची सफर कार्यक्रमाचे आयोजन.

वेंगुर्ला.

   सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजी अँड नॅचरल हिस्ट्री (SACON) ने गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रातील पश्चिम घाट, पश्चिम किनारा आणि समुद्रकिनारी असलेल्या बेटांवर भारतीय स्विफ्टलेटचे संवर्धन करण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. सिंधुदुर्गातील वेंगुर्ला खडकातील इंडियन स्विफ्टलेटवरील त्यांचे संशोधन विशेष आणि प्रशंसनीय आहे.अशा प्रकारे, वेंगुर्ला समुदायामध्ये जागृती करण्यासाठी असे प्रयत्न वेळोवेळी होत राहिले पाहिजेत. 
   हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी १५ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह, वेंगुर्ला येथे माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषद आणि बॅ बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला तसेच Round Glass Station आणि SACON यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
   तरी वेंगुर्ल्यातील आणि कोकणातील सर्व विद्यार्थी आणि नागरिकांना आवाहन करण्यात येते की, या कार्यक्रमास सर्वांना प्रवेश निःशुल्क असून मोठया संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.