भाजपकडून १२ जागांसाठी तब्बल ४८ नावे चर्चेत.....प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर
मुंबई
विधानपरिषदेच्या १६ जागा आणि एका पोटनिवडणुकीसाठी जाहीर झालेल्या रणसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवारी निश्चितीच्या हालचालींना वेग आला आहे. महायुतीमधील जागा वाटपाचा अंतिम निर्णय प्रलंबित असतानाच, भाजपने आपल्या कोट्यातील संभावित १२ जागांसाठी तब्बल ४८ इच्छुकांच्या नावांची यादी तयार केली आहे. ही यादी घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे दिल्लीला रवाना होणार आहेत.दिल्ली दौऱ्यात ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन उमेदवारांच्या नावांवर सविस्तर चर्चा करणार आहेत.उमेदवारी अर्ज भरण्यासाठी १ जूनपर्यंतची मुदत शिल्लक असल्याने पुढील २ ते ३ दिवसांत भाजपच्या १२ उमेदवारांची नावे निश्चित केली जातील. चव्हाणांच्या या दौऱ्यात महायुतीमधील जागावाटपाचा फॉर्म्युला आणि इतर तांत्रिक बाबींचा सविस्तर तपशीलही केंद्रीय नेतृत्वासमोर मांडला जाणार आहे. महायुतीमध्ये भाजपने स्वतःकडे १२ जागा ठेवून शिवसेनेला ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) १ जागा देण्याचा फॉर्म्युला मांडला आहे असे बोलले जात आहे.
konkansamwad 
