किरण आरोलकर यांना बाबा आमटे स्मृती समाजसेवक पुरस्काराने सन्मानित.
सिंधुदुर्ग.
समाजसेवेसाठी पुरस्कार जाहीर झाला याचा आनंद तर खूप झाला. आज प्रत्यक्षात साहित्य संघ गिरगाव मुंबई येथे संपन्न झालेल्या एकता कल्चरल अकादमी कडून ज्येष्ठ गायिका पद्मजा फेणाणी आणि जेष्ठ रंगकर्मी अशोक समेळ यांच्या उपस्थितीत बाबा आमटे स्मृती समाजसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना श्री आरोलकर असे म्हणाले की, या पुरस्काराचे मानकरी अनेक व्यक्ती आहेत. सर्वात प्रथम माझी पत्नी जिने मला हे सगळं करण्यासाठी वेळ दिला. माझे आई - बाबा, भाऊ, बहीण, माझी कै.आजी तसेच मिञ - मैत्रिणी समस्त आरोलकर परिवार, मित्र परिवार विरार, मी जिथे काम करतो त्या San prints pvt Ltd या कंपनीचे माझे दोन्ही सर, तसेच सर्व स्टाफ, सामाजिक बांधिलकी संस्था आणि माझे सर्व सहकारी तसेच माझी हक्काची आपली माणसे, आई भवानी मित्र परिवार, तसेच ज्यांनी - ज्यांनी आज पर्यंत आम्हाला समाज सेवा करण्यासाठी सढळ हस्ते मदत केली ते सर्व मायबाप तसेच आमच्या आयुष्यात कठीण समयी आमच्या मागे उभे असणारी तमाम मित्र- मैत्रिणी , मायबाप या सर्वांच्या सहकार्याने आज मला हा समाजसेवा पुरस्कार मिळाला.ज्या श्रेष्ठ व्यक्तीच्या नावाने हा पुरस्कार मिळाला त्या दिवंगत बाबा आमटे यांच्या परिवाराला माझा त्रिवार सलाम!
माझ्या आयुष्यात मला साथ देणारी माझी जीवा भावाची माणसे माझ्या आयुष्यात कठीण प्रसंगी मला साथ देणारी माझी हक्काची माणसे कायम माझ्यासोबत आहेत हे माझं भाग्य आहे. मी एकटा काही करू शकलो नसतो. कारण साथ तुम्हा सर्वांची आहे. तेव्हा हा पुरस्कार आपल्या सर्वांचा आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहु द्या अशी भावना यावेळी श्री आरोलकर यांनी व्यक्त केली.