दहावी, बारावी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत परुळेकडून सन्मान

परुळे
ग्रामपंचायत परुळेबाजार कार्यक्षेत्रात दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले आहे या कार्यक्रमप्रसंगी अध्यक्ष म्हणून माजी सभापती निलेश सामंत तसेच प्रमुख मार्गदर्शक डॉ. विलासिनि पाटकर (पि.एच डिं.कॉमर्स गोल्ड मेडल)व डॉ. उमाकांत सामंत या मान्यवरांच्या उपस्थितीत गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दूधवडकर, सदस्य प्रदीप प्रभू, अभय परुळेकर, सुनाद राऊळ, प्राजक्ता पाटकर, सीमा सावंत, तंटामुक्त अध्यक्ष पुरुषोत्तम प्रभू, व्हाईस चेअरमन प्रसाद पाटकर, ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे, आरोग्य सेवक शिवाजी चव्हाण यांसह विद्यार्थी व पालक तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेले विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मुलांना मार्गदर्शन करताना आयुष्याच्या या महत्वाच्या वळणावर करिअर निवडताना योग्य विचार, आपली आवड, महत्त्वाकांक्षा व शिक्षणाची आवड या सर्व गोष्टींचा विचार करूनच निर्णय घ्यावा असे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले. सध्याच्या स्पर्धेच्या युगात विविध संधी उपलब्ध आहेत त्याचा अभ्यास केला पाहिजे असे देखील ते पुढे म्हणाले. यावेळी मुलांना शैक्षणिक साहित्य तसेच पर्यावरण पूरक वृक्ष वाट प करण्यात आले.सूत्रसंचालन पुरुषोत्तम प्रभू आभार प्रदीप प्रभू यांनी मानले