किर्लोस येथे 'एक मुल एक झाड' या संकल्पनेतून कृषीदूतांकडून वृक्षारोपण.

कुडाळ.
भारताच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्रामपंचायत किर्लोस व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावठणवाडी, किर्लोस व येथे 'एक मुल एक झाड' या संकल्पनेतून छ. शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस - ओरोस येथील महाविद्यालयातील विदयार्थ्यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मिलींद घाडीगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, तसेच ग्रामपंचायत किर्लोस येथील ध्वजारोहण सरपंच सौ. साक्षी चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यानंतर विदयार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणाद्वारे आपले मत मांडले. सामाजीक कार्यकर्ते अर्जुन लाड व माजी सैनिक गोपाळ किर्लोस्कर यांनी स्वातंत्र्यदिनाबद्दल विचार मांडले. त्यानंतर निपुण माता सत्कार समारंभ व प्रशांत सावंत फाऊंडेशनतर्फे वहया वाटप कार्यक्रम झाला. त्यानंतर गावचे जेष्ठ नागरिक सुगन घाडीगावकर व मुख्याध्यापिका सौ. स्नेहल राणे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण झाले. यावेळी लहान मुलांनी हस्तकलेद्वारे केलेल्या राख्यांचे प्रदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व समारोप प्रा. असरोंडकर सर यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी, सरपंच सौ. साक्षी चव्हाण, उपसरपंच अजित लाड, ग्रामसेवक डी. एन. रावले, पोलीस पाटील किशोर लाड, जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल राणे, प्रा. महादेव असरोंडकर, प्रा. नितीन कदम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मिलिंद घाडीगावकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, कृषीदूत मंगेश गुरव, सौरभ रजपूत अंकित भोये, गौतम के.पी.यश भुसाणा, प्रतिक कदम, ऋषीकेश पाटिल ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थीत होते.