आडियलय मध्ये श्रावणधारा सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन.
कणकवली.
आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे व डॉ. राजअहमद हुसेनशा पटेल चॅरिटेबल ट्रस्ट हरकुळ बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी व खुल्या गटासाठी जिल्हास्तरीय ‘श्रावणधारा’ सुगम संगीत स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेची प्रथम फेरी २० ऑगस्टला सकाळी १० ते दुपारी १ यावेळेत स्कूलमध्ये होईल, तर अंतिम फेरी २ सप्टेंबरला सकाळी १० ते दुपारी १यावेळेत स्कूलमध्ये होईल. ही ५ वी ते ८ वी व ९ वी ते १२ वी व खुला गट अशा तीन गटात होईल. तिन्ही गटांना भावगीत, भक्तीगीत, नाट्यगीत, गझल यापैकी एक ५ मिनिटे गाणे सादर करायचे आहे. ५ वी ते इयत्ता ८ वी गटासाठी अनुक्रमे १५०० रु.व चषक, १००० रु. चषक ८०० रु. चषक, उत्तेजनार्थसाठी प्रमाणपत्र, ९ वी ते १२ वी गटासाठी अनुक्रमे २००० रु. व चषक, १५०० रु. व चषक, १०००रु. व चषक उत्तेजनार्थसाठी प्रमाणपत्र, खुला गटासाठी अनुक्रमे २५०० रु. व चषक, २००० रु. व चषक, १५०० रु. व चषक उत्तेजनार्थसाठी प्रमाणपत्र अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावनोंदणी (१६/८/२०२३) या तारखेपर्यंत करणे असून नावनोंदणीसाठी (९५२७९९५००),(९८९०५२०८८८)(८३८००५३६४१)(९८९०२६७१३८) या क्रमाकांवर संपर्क साधावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.