दाभोली येथे शेतकरी मेळावा संपन्न.
वेंगुर्ला.
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम २०२३ अंतर्गत दाभोली येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला.
या मेळाव्यास माजी सरपंच गुरुनाथ कांबळी, माजी सरपंच मनाली हळदणकर, जेष्ठ नागरिक गुरुनाथ जोशी, दाभोली हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री. सोनसुरकर, उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेचे सहयोगी अधीष्ठाता डॉ.राजन खांडेकर, प्रा.डॉ.परेश पोटफोडे, डॉ संदीप गुरव, ग्रामसंघ अध्यक्ष सौ.जयंती पवार ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.
या मेळाव्यात उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेचे श्री परेश पोटफोडे यांनी अळंबी लागवड यावर माहिती व प्रात्यक्षिक करून दाखवले त्याचबरोबर डॉ.संदीप गुरव यांनी नारळावरील कीड रोग नियंत्रण यावर माहिती दिली तसेच महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता राजन खांडेकर यांनी कोकणातील बागायती पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापन व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे व समस्यांचे निरसन केले.
या मेळाव्याचा गावातील ४२ शेतकऱ्यांनी लाभ घेतला.मेळावा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे विध्यार्थी कु.शुभम घवाळी, तेजस कणेरकर,सौरभ सैद,साईनाथ शिंदे व जोबिन सलीन यांनी विशेष मेहनत घेतली.