परुळेबाजार येथे महिला दिनानिमित्त महीलांसाठी हाडांची ठिसूळता व अस्थिव्यंग तपासणी शिबिर संपन्न.

वेंगुर्ला.
परुळे युवक कला क्रिडा मंडळ, परुळे महालक्ष्मी वाचनालय व ग्रंथ संग्रहालय परुळे आयोजित श्री.देव.वेतोबा देवस्थान परुळे यांनी पुरस्कृत महीला दिना निमित महिलांसाठी अस्थिव्यंग व हाडांची ठिसूळता या विषयी तपासणी शिबिर आयोजित करण्यात झाले होते. या शिबिरात डॉ.दत्तात्रय ठाकुर यांनी तपासणी केली. तसेच तंत्र डॉ.अक्षय कुन्हाडे व विशाल थोरव यांनी सहाय्य केले. यावेळी 60 जणांनी या शिबिराचा लाभ घेतला.यावेळी उपस्थितांना अस्थिव्यंग व हाडांची ठिसूळता याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी परुळे युवक किडा मंडळ अध्यक्ष अजित परुळेकर डॉ. प्रशांत सामंत सुनील माडये पुरुषोत्तम प्रभू देवस्थानचे दिपक सामंत, वासुदेव सामंतयांसह युवक मंडळाच्या महीला विभागाच्या पूर्वा नाईक, आदिती परुळेकर, आरती सामंत, प्रणिता प्रभु, अंजली तेली, सौ.सामंत आदी उपस्थित होते.
महीलांसाठी फुगडी महोत्सव रविवार दिनांक १७. मार्च रोजी अण्णासाहेब देसाई विद्यामंदीर परुळे रंगमंचावर होणार आहे तरी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.