लातूर जि.प.टिमने दिली परुळेबाजार ग्रामपंचायतीला भेट. विविध स्वच्छता विषयक उपक्रमांची माहिती घेत केले कौतुक.

लातूर जि.प.टिमने दिली परुळेबाजार ग्रामपंचायतीला भेट.  विविध स्वच्छता विषयक उपक्रमांची माहिती घेत केले कौतुक.

वेंगुर्ला.

  राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अंतर्गत राज्यांतर्गत लातूर जिल्हा परिषदेची टिम कोकण अभ्यास दौऱ्यावर आली आहे.यावेळी विविध स्थानिक स्वराज्य संस्थांना भेटी देत आहे या अंतर्गत त्यांनी नुकतीच परुळे बाजार ग्रामपंचायतीला भेट दिली व अभ्यास केला.
   यामध्ये उपमुख्यकार्यकारी अधिकारी ग्रा.पं.दतागय गिरिजिल्हा कृषी अधिकारी श्री घोले, गटविकास अधिकारी पं.स.निलंगा सोपान अकोले, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय आडे, सरपंच शेळगी ( निलांगा) बंकट जिमदार, विस्तार अधिकारी ग्रा पं. उपरवार, विस्तार अधिकारी श्री बोंबले, पर्यावेक्षीका दंडीगो, ग्रामसेवक गजानन डोले, सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दुदवडकर, माजी सरपंच प्रदीप प्रभु यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले.
  यावेळी सदस्य सीमा सावंत, नमिता परुळेकर, सुनाद राऊळ तसेच प्रेमा जाधव उपस्थित होते.यावेळी आलेल्या टीमने येथे विविध उपक्रमांची माहिती घेतली व उपक्रमांचे कौतूक केले.