संस्था मान्यतेसाठीच्या प्रस्तावास मुदतवाढ. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांची माहिती.

संस्था मान्यतेसाठीच्या प्रस्तावास मुदतवाढ.  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांची माहिती.

सिंधुदुर्ग.

    क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविण्यासाठी संस्था मान्यतेसाठीच्या प्रस्तावास मुदतवाढ देण्यात आली आहे.नविन प्रस्ताव 17 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे.
  महिला व बालविकास विभाग अंतर्गत अनाथ, निराश्रीत, निराधार, बेघर, दुर्धर आजारी पालकांची मुले कैद्यांची मुले, काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुला-मुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करुन देणे व संस्थेतील वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास घडवून आणणे. या उद्देशाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना दि.30/05/2023 च्या शासन निर्णयानुसार कार्यन्वित करण्यात आलेली आहे. शासननिर्णयातील तरतुदीच्या अनुषंगाने बालसंगोपन योजना जिल्हास्तरावर राबविण्याकरीता विहित पात्रतेचे निकष पुर्ण करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेची निवड करण्याकरीता शासन निर्णयातील परिशिष्ट ब, क, ड, फ. व इ नुसार संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी शासनाच्या www.maharashtra.gov.in  आणि आयुक्तालयाच्या www.wedcommpune.com  या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
   जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत तसेच आयुक्त महिला व बाल विकास कार्यालयामार्फत दि. 8/8/2023  रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार सदर प्रस्ताव मागणीची मुदत ही दि. 15/9/2023 अशी होती. मात्र आयुक्त महिला व बाल विकास पुणे यांच्या कार्यालयाकडील पत्रनुसार प्रस्तावाच्या मागणीसाठी मुदत वाढ देण्यात येत आहे. जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय, सिधुदुर्ग प्रशासकीय इमारत ए-विंग, तळमजला, दालन क्र. 106, सिंधुदुर्गनगरी या कार्यालयाकडे दि. 17 नोव्हेंबर  पर्यंत नवीन प्रस्ताव न स्विकारले प्रस्ताव तसेच यापुर्वी या कार्यालयात अपूर्ण प्रस्ताव सादर केलेल्या संस्थांनी देखील 4 प्रतीत पुनश्च परिपुर्ण प्रस्ताव सादर करावेत. अधिक माहितीसाठी या कार्यालयाशी दूरध्वनी क्र. 02362-222869 वर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. सोमनाथ रसाळ यांनी केले आहे.