नारायण राणे यांना थेट मतदान करण्याची प्रथम संधी देवगड वासियांना मिळालीय : निलम राणे.

नारायण राणे यांना थेट मतदान करण्याची प्रथम संधी देवगड वासियांना मिळालीय : निलम राणे.

देवगड.

   केंद्रात आणि आता राज्यात राज्यात आणि आता केंद्रात काम करताना नारायण राणे यांनी कायमच जिल्ह्याच्या विकासावर विकासासाठी भर दिलाय आपला जिल्हा विकसित व्हावा हा त्यांच्या हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे त्यासाठीच ते झटत आहेत.आपण निवडून दिलेल्या खासदार हा आपण निवडून दिलेल्या आमदार खासदार हा जनतेच्या विकासासाठी असतो मात्र येथील खासदाराने दहा वर्षे काय केले हा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतो.आपण ज्या उमेदवाराला खासदार म्हणून निवडून देतो, त्याने काय काम केले हे विचारण्याचा आपला हक्क बनतो.त्यामुळे येथील खासदाराने गेल्या दहा वर्षात जिल्ह्याचा कोणता विकास केला, हे विचारायची वेळ आली आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे,आमदार नीतेश राणे,माजी खासदार नीलेश राणे यांनी मतदारसंघच हे आपले घर आहे असे समजतात.येथील जनतेचे प्रश्न त्यांनी पालक या नात्याने सोडविले.त्यामुळे आम्ही हक्काने आपल्यासमोर आलो आहोत.विरोधकांकडे पंतप्रधान पदासाठी सक्षम चेहरा नाही.त्यामुळे मोदींचे हात अधिक बळकट करण्यासाठी आपल्या हक्काचा खासदार संसदेत हवा, नारायण राणेंच्या रुपाने ही संधी आपल्याला प्रथमच मिळाली असून येथील जनतेने त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन भाजपच्या महिला नेत्या सौ.नीलम राणे यांनी केले.
   पडेल कॅन्टिन येथे शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या महिला लाभार्थी मेळाव्यात त्या बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, कणकवलीच्या माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, जि.प. माजी अध्यक्षा सुमेधा पाताडे, माजी जिल्हाध्यक्षा अस्मिता बांदेकर, भाजप जिल्हा उपाध्यक्षा प्रियांका साळसकर, भाजप महिला मोर्चा देवगड मंडल अध्यक्षा उषःकला केळूस्कर, पडेल मंडल अध्यक्षा सौ. संजना आळवे जि.प.माजी सदस्या मनस्वी घारे, पडेल मंडल अध्यक्ष डॉ.अमोल तेली, पडेल सरपंच भूषण पोकळे, आदी उपस्थित होते.
     सौ.राणे म्हणाल्या, काँग्रेस सरकारच्या काळात शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळत नव्हता.मात्र, नरेंद्र मोदी सरकारच्या अवघ्या दहा वर्षाच्या काळात शासकीय योजना खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत पोहोचल्या. नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वामुळे भारत देश आज महासत्तेच्या उंबरठ्यावर आहे,असे त्यांनी सांगितले. नारीशक्तीची ताकद राणेंच्या पाठीशी उभी करा!
आपला आमदार नीतेश राणे यांनी मतदारसंघात केलेली विकासकामे पाहून येथील खासदार त्यांच्यासमोर येण्यास घाबरत असतील.असा टोला लगावत सौ.राणे म्हणाल्या, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही कोणत्याही पदावर काम करताना कोकणच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे.कोकणात विकासगंगा आणली आहे.कोकणच्या विकासाचा ध्यास घेऊन ते समाजहितासाठी अहोरात्र झटत आहेत.आज जिल्ह्यात महिलांची संख्या अधिक आहे. या नारीशक्तीची ताकद लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंच्या पाठीशी उभी करून मोठ्या मताधिक्क्याने त्यांना विजयी करा,असेही यावेळी निलम राणे म्हणाल्या.
    यावेळी मेघा गांगण, सुमेधा पाताडे, श्वेता कोरगावकर, सौ. तन्वी चांदोस्कर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन माजी सरपंच सौ. उल्का जोशी,नाडण उपसरपंच सौ.प्रतीक्षा केळकर यांनी केले.तर उपस्थितांचे आभार डॉ.अमोल तेली यांनी व्यक्त केले.