परुळेबाजारच्या स्वच्छतादूत प्रेमा जाधव यांचा ‘सीईओं’ कडून सन्मान.

परुळेबाजारच्या स्वच्छतादूत  प्रेमा जाधव यांचा ‘सीईओं’ कडून सन्मान.

परुळे.

    केंद्र शासनाच्या पेयजल आणी स्वच्छता विभाग स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) या विभागातर्फे सिंधुदुर्ग जिल्हयातील वेंगुर्ला तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायतीला प्रजासत्ताक दिनी विशेष आमंत्रित म्हणून माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य प्रदिप प्रभु व स्वच्छतादूत श्रीम प्रेमा नारायण जाधव यांचा दिल्ली येथील कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. त्याबाबत त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा परिषद सिंधुदुर्ग चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत  नायर यांनी त्यांना ओरोस येथे सन्मान केला.यावेळी ग्रामसेवक शरद शिंदे उपस्थित होते.
   दिल्ली येथे देशातील स्वछता दूताना निमंत्रण करण्यात आले होते यावेळी केंद्रीय  जल शक्ती विभागाचे मंत्री राजेंद्रसिंह  शेखावत, राजीव चंद्रशेखर, विश्ववर ताडु यांसह अधिकारी उपस्थित होते यावेळी वेगुले तालूक्यातील  परुळेबाजार ग्रामपंचायतीचे श्रीम प्रेमा जाधव यांचा मंत्री महोदयांनी विशेष सन्मान केले अक्षरश: मंत्री महोदय प्रेमा जाधव यांचा वयाच्या मान राखत स्वच्छता विषयक कामा बाबतीत त्यांच्या समारे नतमस्तक झाले. व संपूर्ण देशातील स्वच्छाग्रही मधुन आपल्या बरोबर व्यासपीठावर बसण्याचा मान माजी सरपंच प्रदिप प्रभु व प्रेमा जाधव यांना मिळाल्या हे विशेष यामुळे हा महाराष्ट्र राज्यासह सिंधुदुर्ग जिल्हा च सन्मान होता त्यामुळे आपल्या जिल्ह्याला हा बहुमान मिळाला याबद्दल जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्यावतीने ग्रामपंचायत परुळे बाजारचे सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दूधवडकर यासह सर्व सदस्य तसेच कर्मचारी यांच अभिनंदन करण्यातआले.आमच्या कामाची पोचपावती असल्याचे प्रतिपादन प्रदिप प्रभु व प्रेमा जाधव यांनी केले. प्रदिप प्रभु यांनीही आपल्या सरपंच पदाच्या कारकीर्दीत ग्रामपंचायतीस  एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे  व आजही ते सातत्याने या कामात आपला ठसा उमटविला आहे. याचाच एक भाग त्यांना हा सन्मान मिळाला आहे.