कणकवली येथे मोबाईल शॉपीला आग; लाखोंचे नुकसान.

कणकवली.
कणकवली पटवर्धन चौकात असणाऱ्या लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या जय श्री मोबाईल या होलसेलर मोबाईलच्या स्पेअर पार्ट व मोबाईल शॉपी च्या दुकानाला आज सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. शॉप मधील मोबाईल व साहित्य आगीत जळून खाक झाले असल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच नागरीकांनी घटनास्थळी धाव घेत पाणी मारून आग आटोक्यात आणायचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात आली नाही.अखेर नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले.अग्निशमन बंब आल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.मात्र शॉप मधील मोबाईल व साहित्य जळून खाक झाले असल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.सदरची आग ही शॉर्ट सर्किटने लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, संजय मालंडकर, माजी नगरसेवक प्रसाद अंधारी, अण्णा कोदे, संतोष पुजारे, चेतन अंधारी, दत्ता शंकरदास, संजय राणे, राजू पारकर, शेखर गणपत्ये, आबा माणगावकर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने मदतीसाठी धावून आले.