जांभवडेचे आधारवड हरपले......माजी ग्रामविकास अधिकारी मनोहर उर्फ भाई मडव यांचे निधन
कुडाळ
माजी ग्रामविकास अधिकारी कै. मनोहर नारायण मडव (भाई मडव - वय ८५, जांभवडे) यांचे सोमवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.२५ वर्षे ग्रामविकास अधिकारी म्हणून सेवा बजावताना त्यांनी घोटगे, सोनवडे, नरडवे, भरणी, दारिस्ते, किंजवडे, तोरसोळे गावांमध्ये रस्ते, शाळा, वीज, पाणी यांसारखी विकासकामे केली. तोरसोळे-देवगड येथे पॅडी पायलट योजनेसाठी प्रथम क्रमांक, तर नरडवे-दारिस्ते येथे बायोगॅस व कुटुंब कल्याण कामासाठी द्वितीय क्रमांक पटकावला होता.१९६२ च्या भारत-चीन युद्धात ते बॉर्डरवर कार्यरत होते. हिंदी प्रबोध व ड्रॉईंग परीक्षांसह इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग पदवी पूर्ण करून त्यांनी सेंटर मेकॅनिकल इंजिनिअरिंग टीममध्ये इन्स्पेक्टर म्हणूनही काम केले होते.सेवानिवृत्तीनंतर जांभवडे गावचे ५ वर्षे उपसरपंच म्हणून काम करताना नळ पाणी योजनेसह अनेक कामे त्यांनी मार्गी लावली.त्यांच्या पश्चात मुलगे, मुली, सुना, जावई, भाऊ, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ग्रामपंचायत सदस्य उदय मडव व कृषी अधिकारी नारायण मडव यांचे ते वडील, तर प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक सावंत यांचे आजोबा होत.त्यांच्या निधनाने जांभवडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
konkansamwad 
