भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा आज वाढदिवस. क्रिकेट कारकिर्दीत आजपर्यंत रचलेत अनेक विक्रम.

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा आज  वाढदिवस.   क्रिकेट कारकिर्दीत आजपर्यंत रचलेत अनेक विक्रम.

मुंबई.

   विराट कोहलीचा आज वाढदिवस असून क्रिकेट मध्ये अनेक विक्रम त्याने आपल्या नावावर केले आहेत. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर २०२३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत, तेव्हा विराटच्या कारकिर्दीतील ही तिसरी वेळ असेल जेव्हा तो वाढदिवसाच्या दिवशी सामना खेळताना दिसणार आहे. भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नावावर अनेक महान विक्रम आहेत. त्याच्या वाढदिवशी तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार असून शतक ठोकून सचिन तेंडुलकर च्या विश्वविक्रमाची बरोबरी करू शकतो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर सर्वाधिक ४९ शतके आहेत आणि कोहली त्याच्या ४८ शतकांसह एक पाऊल मागे आहे.विराट कोहलीने या ३५ वर्षात अनेक विक्रम केले आहेत.त्या मध्ये  टी-२० मध्ये सर्वाधिक धावा (४००८) करणारा फलंदाज.एकदिवसीय क्रिकेटमध्ये ( २०५ डावात ) १० हजार धावा करणारा सर्वात वेगवान फलंदाज. सलग तीन वर्षांत २५०० हून अधिक धावा करणारा एकमेव खेळाडू (२०१६,२०१७,२०१८). कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतके करणारा फलंदाज (श्रीलंका १०) सर्वाधिक २० प्लेअर ऑफ द सिरीज जिंकणार खेळाडू.एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक ५५८ धावा करणारा फलंदाज. टी-२०मध्ये सर्वाधिक ३८ अर्धशतके झळकावणारा खेळाडू. टी-२० मध्ये सर्वाधिक १५ सामनावीर पुरस्कार जिंकणारा खेळाडू. टी-२० मध्ये एकही चेंडू न टाकता विकेट घेणारा एकमेव खेळाडू, त्याने कारकिर्दीतील पहिला चेंडू वाईड टाकला आणि केविन पीटरसन ला यष्टीचीत केले. ODI मध्ये पाठलाग करताना २६ शतकांची सर्वोच्च धावसंख्या.एका वर्षात किमान ११ एकदिवसीय डावात केल्या १००० धावा .कमीत कमी ६५ कसोटी डावात ४००० धावा करणारा कर्णधार. एका वर्षात सहा एकदिवसीय शतके झळकावणारा एकमेव कर्णधार, १० हजार धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये ५० पेक्षा जास्त सरासरी असलेला एकमेव फलंदाज. एकाच संघासाठी सहा शतके करणारा एकमेव खेळाडू (RCB). सहा हंगामात ५०० पेक्षा जास्त धावा करणारा एकमेव खेळाडू. आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक ९७३ धावा करणारा फलंदाज. आयपीएलच्या एका मोसमात चार शतके करणारा पहिला खेळाडू.सर्वाधिक सामने जिंकणारे भारतीय (३०८). सर्वाधिक ४० कसोटी जिंकणारा भारतीय कर्णधार.कसोटीत कर्णधार म्हणून सर्वाधिक सात द्विशतके झळकावणारा खेळाडू. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १२००० धावा करणारा फलंदाज (२४२वनडे). सर्वाधिक ६८ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करणारा खेळाडू.लक्ष्याचा पाठलाग करताना एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च सरासरी ६६. सध्याच्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक ७८ शतके झळकावणारा खेळाडू. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक १५० झेल घेणारा भारतीय क्षेत्ररक्षक, देशासाठी सर्वाधिक प्लेअर ऑफ द सिरीज बनलेले खेळाडू (२०) एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५८ सरासरी असलेला खेळाडू. वनडेमध्ये सर्वात जलद १३ हजार धावा करणारा फलंदाज (२६७ सामने). टी-२० मध्ये सर्वाधिक सात प्लेअर ऑफ द सिरीज जिंकणारा खेळाडू ICC ODI क्रमवारीत ८९० गुण मिळवणारा पहिला भारतीय फलंदाज. ICC कसोटी क्रमवारीत ९२२ गुण मिळवणारा एकमेव खेळाडू. दोन देशांविरुद्ध (वेस्ट इंडीज,श्रीलंका) सलग तीन शतके करणारा पहिला खेळाडू.सर्व प्रकारच्या टी-२० मध्ये १० हजार धावा करणारा पहिला भारतीय ठरला आहे असे अनेक विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहेत.