पश्चिम घाट ESZ मसुदा अधिसूचनेवर २६ सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदवा.....सिंधुदुर्गातील १९८ गावांचा समावेश

पश्चिम घाट ESZ मसुदा अधिसूचनेवर २६ सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदवा.....सिंधुदुर्गातील १९८ गावांचा समावेश

सिंधुदुर्ग, दि. २६


       केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व वातावरण बदल मंत्रालयाने पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (ESZ) घोषित करण्यासाठी मसुदा अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना दि. २७ जुलै २०२६ रोजीच्या क्र. का. आ. ४१०६ (अ) अन्वये प्रसिद्ध करण्यात आली असून http://egazette.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती उप वनसंरक्षक (प्रा.) मिलिश शर्मा यांनी दिली.या मसुद्यानुसार महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांमधील ५६ तालुक्यांतील २ हजार ५९५ गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, देवगड आणि वैभववाडी या पाच तालुक्यांतील १९८ गावांचा समावेश आहे.या प्रस्तावामुळे ज्या स्थानिक रहिवाशांवर परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यांनी Environment (Protection) Act, 1986 व Environment (Protection) Rules, 1986 मधील तरतुदींनुसार आपले आक्षेप ६० दिवसांच्या आत म्हणजेच २६ सप्टेंबर २०२६ पर्यंत नोंदवावेत.हरकती पर्यावरण, वन व वातावरण बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवी दिल्ली - ११०००३ या पत्त्यावर तसेच esz-mef@nic.in या ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.