कणकवली येथे दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न

कणकवली
महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्गच्या वतीने कणकवली येथील वागदे पंचक्रोशीतील सर्व दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये वागदे गावचे सरपंच संदीप सावंत, ग्रामसेवक युवराज बोराडे, सदस्य संजना गावडे, शुभांगी राणे, कौशल्य विकास कडून पुजा पटकारे व नेहा परब तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे तसेच संस्था कर्मचारी संजना गावडे, प्रणाली शिर्के, विशाखा कासले, दिपक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या वतीने स्वागत सभारंभ करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व ग्रामसेवक युवराज बोराडे आणि सरपंच संदीप सावंत यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे आणि सरपंच सावंत यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. पुनर्वसन केंद्राच्या वतीने उपस्थित दिव्यांग बांधवाना भेटवस्तू वाटप करण्यात आल्या.या मेळाव्याला 40 हून जास्त दिव्यांग उपस्थित होते.विनसन क्रीडा मंडळ वागदेच्या वतीने सर्व दिव्यांग बांधवांना उपहार देण्यात आला असून पुनर्वसन केंद्राच्या वतीने मयूर गणेश धुरी यांना कानाची मशीन व श्रद्धा परब यांना एमआर किट देण्यात आले. संस्था कर्मचारी दळवी मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.