युवराज लखमसावंत भोंसले यांची संजय घोडावत युनिव्हर्सिटीच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी निवड
सावंतवाडी
मुंबई विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले यांची संजय घोडावत युनिव्हर्सिटी, कोल्हापूरच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाली आहे.शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल म्हणून ही निवड झाली आहे. भोंसले सध्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर उत्तम काम करत असून, सिंधुदुर्गातील सर्वात जुने, NAAC 'A' श्रेणी प्राप्त, स्वायत्त व लीड कॉलेज असलेल्या श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार IT, CS, डेटा सायन्स, AI असे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे.या निवडीबद्दल श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी कार्याध्यक्षा राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, संचालक प्रा. डी.टी. देसाई, सहाय्यक संचालक अॅड. शामराव सावंत, प्राचार्य डॉ. डी.एल. भारमल, प्राचार्या डॉ. अश्विनी लेले, मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
konkansamwad 
