राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी विजय कदम.

सावंतवाडी.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी विजय कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खास. सुनिल तटकरे यांच्या आदेशानुसार राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे राज्य प्रमुख श्री. मगरे यांनी ही नियुक्ती केली.
श्री.कदम यांनी गेले एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस असताना पाच वर्ष सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्षपदी काम केले होते.अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रामाणिक काम करत आहेत. युवक संघटना वाढीसाठी त्यांनी त्यांनी काम केले. अनेक दिवस पक्षाला दिलेले योगदान लक्षात घेता त्यांना ही संधी देण्यात आली आहे.
यासाठी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर, महाराष्ट्र राज्याचे चिटणीस सुरेश गवस, सावंतवाडी तालुका अध्यक्ष उदय भोसले यांच्या शिफारशीने ही नियुक्ती देण्यात आली.यावेळी पक्ष वाढीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम करणार असल्याचे श्री. कदम यांनी स्पष्ट केले.