हुकूमशाही कारभाराविरोधात वेंगुर्ला एसटी कर्मचारी संघटनेचे उपोषण सुरू

हुकूमशाही कारभाराविरोधात वेंगुर्ला एसटी कर्मचारी संघटनेचे उपोषण सुरू


वेंगुर्ला
      सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाकडून वेंगुर्ला आगार वाहतूक निरीक्षक व सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांच्या मनमानी आणि हुकूमशाही कारभाराविरोधात व त्यांच्या तात्काळ बदलीसाठी आज 26 जानेवारी रोजी वेंगुर्ला आगाराच्या बाहेर उपोषण करण्यात आले आहे. तसेच जोपर्यंत आगार वाहतूक निरीक्षक व सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांची तात्काळ बदली होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालू ठेवण्याचा इशारा सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाकडून करण्यात आला आहे. 
    त्यांनी सदर प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की, आगार वाहतूक निरीक्षक व सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांच्याकडून एसटी कर्मचाऱ्यांना गेली सहा महिने होणारा मानसिक त्रास, शिवीगाळ, धमकावणे असे 16 मुद्दे असलेली प्रत पुरावे प्रशासनाला देऊ न ही त्यांच्याकडून कुठलीही दखल घेतली गेली नाही किंवा कुठलेही कारवाई केली गेली नाही मग हे नियम अटी फक्त चालक वाहक यांत्रिक साठीच आहेत का? अधिकारी त्यात का डावलले जातोय हा प्रश्न या संघटने कडून उपस्थित करण्यात आले आहे. तसेच या संदर्भातील निवेदन आगार व्यवस्थापकांना देऊन ती पुढे विभागीय कार्यालयाला पाठवून ही 15 दिवस होऊन गेले तरी कोणत्याही प्रकारचं लेखी उत्तर किंवा कारवाई अजूनही झालेली नाही. त्यामुळे हे उपोषण सुरूच राहील असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी भरत चव्हाण, दाजी तळवणेकर, सखाराम सावळ, स्वप्निल रजपूत, महादेव भगत, मिलिंद मयेकर, प्रकाश मोहिते, विनायक दाभोलकर, पंकज पेडणेकर, सुरेश मांजरेकर, दादा परब, मंगलदास पेडणेकर, भूषण पेडणेकर, उदय शिरोडकर, महेश रेडकर, साईनाथ दाभोलकर, प्रवीण रेवणकर आदी उपस्थित आहेत. 
   तसेच या एसटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला वेंगुर्ला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा देखील पाठिंबा आहे. आज प्रशासनाच्या प्रत्येक ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो आणि आज त्याच दिवशी कर्मचाऱ्यांना उपोषण करण्याची वेळ आली आहे हे मोठ दुर्दैव आहे एसटी कर्मचाऱ्यांना हेतूपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकारी या नात्याने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी दिले. यावेळी विभाग प्रमुख संदीप पेडणेकर, अजित राऊळ, संदेश निकम, गजानन गोलतकर आदी उपस्थित होते.