पंतप्रधान नरेंद्र मोदींचे त्रिवेणी संगमात अमृतस्नान

उत्तर प्रदेश
१४३ वर्षांतून एकदाच येणाऱ्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत कोट्यवधी भारतीयांनी पवित्र स्नान केले असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील त्रिवेणी संगमात अमृतस्नान केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सकाळी महाकुंभ मेळ्याला उपस्थित राहण्यासाठी प्रयागराज येथे दाखल झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम असलेल्या त्रिवेणी संगमापर्यंत बोटीने प्रवास केला. नदीत गुडघ्यापर्यंत उभे राहून प्रार्थना करताना त्यांनी 'रुद्राक्षांच्या माळा धरून मंत्रांचा जप केला. त्यानंतर त्यांनी त्रिवेणी संगमात पवित्र अमृतस्नान केले.