रोणापाल येथे ३ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन.

सावंतवाडी.
माजी सरपंच प्रकाश गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ, रोणापाल आयोजित दि. 3 एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मडुरा तिठा येथील सावित्री शंकर मंगल कार्यालयात शिबिरास सकाळी 9 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. रोणापाल गावासह पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजवंत रुग्णांना जीवनदान द्यावे असे आवाहन, श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रकाश गावडे यांनी केले आहे.