कणकवलीत अवयवदान, नेत्रदान, देहदान, रक्तदान व रुग्णमित्र संकल्पना कार्यशाळा संपन्न.
कणकवली.
१३ ऑगस्ट जागतिक अवयव दिन व पुढील पंधरवडा साजरा करणे याचे औचित्य सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा कणकवली व गोपुरी आश्रम वागदे कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान देहदान अवयवदान व रुग्णमित्र संकल्पना याविषयी कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेचे उद्घाटन सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, श्री.वाडेकर देवगड, गोपुरीचे संचालक मंगेश नेवगी, विनायक उर्फ बाळू मेस्त्री तसेच विरेंद्र परब शिरोडा यांच्या हस्ते आप्पासाहेब पटवर्धन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले.
त्यानंतर सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्यावतिने आपल्या मातोश्रींचे पहिले देहदान करणाऱ्या शिरोडा येथील रक्तदाते विरेंद्र परब शिरोडा यांचा कणकवली शाखेकडून शाल श्रीफळ, कोकण गांधी आप्पा साहेब पटवर्धन यांच्या चरित्त्राचे पुस्तक, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विरेंद्र परब हे एबी निगेटिव्ह डोनर आहेत, त्यांनी आतापर्यंत ३९ वेळा रक्तदान केले आहे.
सिंधु प्रतिष्ठानचे गोवा समन्वयक संजय पिळणकर यांनी कार्यशाळेला शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यशाळेला खास रत्नागिरी देवरुख वरुन आलेले व गोपुरी आश्रमचे संचालक युयुत्सु आर्ते रत्नागिरी यांनी अवयवदान या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. तसेच प्रतिष्ठानच्या कामाचे कौतुक केले. यावेळी त्यांनी स्मशानमुक्त गाव ही संकल्पना मांडली.
अवयवदान या विषयावर अवयवदान चळवळीचे किशोर कदम कणकवली यांनीही सविस्तर मार्गदर्शन केले. गोपूरी आश्रमचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी संस्थेच्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केलं, अशा उपक्रमांची गरज असल्याचे प्रतिपादन केलं, युवा पिढीने यात सहभाग घेत ही चळवळ ग्रामीण भागात पर्यत पोहचवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. प्रतिष्ठानचा हा कार्यक्रम कौतुकास्पद आहे असं सांगून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे मुख्य संस्थापक तथा अध्यक्ष, या कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक व कार्यक्राचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी अवयवदान देहदान, रक्तदान व रुग्णमित्र संकल्पना याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.