विजयदुर्ग किल्ला येथे १५६ वा जागतिक ‘हेलियम डे’ साजरा.

विजयदुर्ग किल्ला येथे १५६ वा जागतिक ‘हेलियम डे’ साजरा.

देवगड.

  ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यामध्ये ब्रिटिश खगोल शास्त्रज्ञ सर नॉर्मन लॉकियर यांनी हेलियम वायूचा शोध लावला.ही घटना समस्त विजयदुर्ग तसेच महाराष्ट्रासाठी भूषणावह असून प्रत्येक विद्यार्थ्याने शोधाचे जनक होण्याचे आवाहन माजी आमदार तथा सिंधुरत्नचे प्रमोद जठार यांनी विजयदुर्ग किल्ला येथे 156 व्या जागतिक हेलियम डे निमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
  ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला येथे 18 ऑगस्ट 1868 साली हेलियम वायूचा शोध लावला. हा दिवस हेलियम डे म्हणून सिंधुरत्न कार्यकारी समिती आणि विजयदुर्ग ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सलग 16 वर्षे मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. यावेळी माजी आमदार जठार, अरीफ बगदादी, विजयदुर्ग सरपंच रियाज काझी, उपसरपंच महेश बिडये, भाजपा पडेल मंडल अध्यक्ष बंड्या नारकर, महिला अध्यक्षा सुप्रिया आळवे, पंचायत समितीचे माजी सभापती रवी पाळेकर, माजी उपसभापती रवींद्र तिर्लोटकर, जि.प.चे माजी बांधकाम सभापती संजय बोंबडी, पवन परुळेकर, गिर्ये सरपंच लता गिरकर, शिडवणे सरपंच रवी शेट्ये, माजी पं. स. सदस्या शुभा कदम, विजयदुर्ग माजी सरपंच प्रसाद देवधर तसेच प्रदीप साखरकर, ग्रा. पं. सदस्य दिनेश जावकर, प्रतिक्षा मिठबावकर, वैशाली बांदकर, जॉस्लीन फर्नांडिस हवाबी धोपावकर, सिंधुदुर्ग बँकेचे व्यवस्थापक श्री.रुमडे आदी उपस्थित होते.
   माजी आमदार जठार पुढे म्हणाले विजयदुर्ग किल्ल्याच्या समोरच दोन एकर जागेत आरमारी म्युझियम साकार होत असून जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांने सिंधुरत्न समितीचे अध्यक्ष तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी 5 कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. यानआरमारी म्युझियम सोबतच लाईट ॲण्ड साऊंड शो तसेच हेलियम म्युझियमही होणार असल्याचे सुतोवाच प्रमोद जठार यांनी केले. तसेच त्यांनी पुढल्या वर्षीच्या हेलियम दिनानिमित्त पडेल कॅन्टीन ते विजयदुर्ग अशी भव्य वर्षा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्याचे जाहीर केले.विजयदुर्ग एस.टी. आगार ते विजयदुर्ग किल्ला (सायबाचे ओटे) अशी ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. हेलियम वायूने भरलेले फुगे घेऊन विजयदुर्ग पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच विजयदुर्ग हायस्कूलची मुलं मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. कार्यक्रमाच्या समारोपावेळी हेलियम वायूने भरलेले फुगे आकाशात सोडून "जय जवान, जय किसान, जय विज्ञान "अशा घोषणा देण्यात आल्या.
  विजयदुर्ग किल्ला येथील साहेबांचे ओटे या ठिकाणी असलेल्यानहेलियम मार्गदर्शन फलकाला जठार यांच्या हस्ते पुष्पहार घालून तसेचनत्या ठिकाणी दुर्बिन उभी करून जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय विज्ञान अशी घोषणा करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयदुर्ग शाळेचे शिक्षक शीतल देवरकर यांनी हेलियमच्या शोधाची माहिती, त्याचा जनमानसातील फायदे याबाबत सविस्तर माहिती दिली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील सारंग यांनी केले व आभार व्यक्त केले.