वेंगुर्ले येथे वाळूशिल्प साकारत देशवासीयांना देण्यात आल्या शुभेच्छा

वेंगुर्ला
वेंगुर्ला येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त संजू हुले यांनी सुबक असे वाळूशिल्प साकारले. एका आठवड्यात एक वाळू शिल्प ते बनवत असतात. यावेळी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून त्यांनी हे सुंदर वाळूशिल्प बनवले. यासाठी लागणारे वाळू, पाणी व इतर सहकार्य वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत देण्यात आले असे श्री हुले यांनी सांगितले. या वाळूशिल्पातून मिळणारे बक्षीस मधून श्री. हुले हे शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करतात. हुले हे एक कलाकार असून गेली १५ वर्ष ते या क्षेत्रात सक्रिय आहे. वाळू शिल्प हा त्यांचा छंद असून झुलता पुलावर येणाऱ्या पर्यटकांसाठी मनोरंजन म्हणून ते अशी कला आठवड्यातून एकदा साकारतात. वेंगुर्ल्यात या कलेला वाव मिळावा व अजून वाळूशिल्पकार उदयास यावे असा प्रामाणिक प्रयत्न श्री हुले यांचा आहे.