सिंधुदुर्ग विद्यानिकेतनच्या सिया गावडेचे क्रीडा स्पर्धेत यश......थाळीफेकमध्ये प्रथम, जिल्हास्तरावर निवड
वेंगुर्ले
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी आयोजित तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा दि. १२ ऑक्टोबर रोजी पार पडली.या स्पर्धेत सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल, वेंगुर्ला या शाळेची इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी सिया भरत गावडे हिने थाळीफेक या क्रीडाप्रकारात १४ वर्षांखालील मुली या गटातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.सियाने मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, सचिव दत्तात्रय परुळेकर, संचालक प्रशांत नेरुरकर, शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले असून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
konkansamwad 
