वेंगुर्ला भाजपाच्या वतीने तालुक्यातील दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार.
वेंगुर्ला.
दरवर्षी प्रमाणे भाजपा वेंगुर्ला च्या वतीने तालुक्यातील प्रथम दहा क्रमांकात येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन करण्यात येतो.यावर्षीही तालुक्यात प्रथम आलेली अर्पिता सामंत व द्वितीय आलेली गायत्री बागलकर यांचा सत्कार परुळे विभागातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन केला. तसेच वेंगुर्ला तालुक्यात तृतीय आलेली वेंगुर्ले हायस्कूल ची विद्यार्थींनी कु.प्रतिक्षा अशोक आरोलकर, तालुक्यात सहावी आलेली वेंगुर्ला हायस्कूल ची विद्यार्थीनी कु.दुर्वा संदिप परब व तालुक्यात दहावी आलेली न्यु इंग्लिश स्कूल उभादांडा ची कु.श्रृती श्रीधर शेवडे या तिनही विद्यार्थिनींचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन करण्यात आला .
यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ९९.७१ % निकाल हा वेंगुर्ला तालुक्याचा लागला, तसेच तालुक्यातील १९ पैकी १७ हायस्कूल चा निकाल १०० % लागला . तसेच ७०८ विद्यार्थांपैकी ७०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून गुणवत्तेत यावर्षीही मुलींनीच बाजी मारली.
लवकरच भाजपा च्या वतीने तालुक्यातील दहावी व बारावीच्या प्रत्येक शाळेतील प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थांचा सत्कार, तसेच १०० % निकाल देणाऱ्या हायस्कूल च्या मुख्याध्यापकांचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येणार आहे .
भाजपा च्या वतिने घरी जाऊन करण्यात आलेल्या सत्कारामुळे पालक वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच विद्यार्थांना कौतुकाची थाप दिल्यामुळे भविष्यात यापेक्षा जास्त गुण मिळविण्याची ईर्शा निर्माण झाली.
या सत्कार समारंभाच्या वेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, जि.का.का.सदस्य वसंत तांडेल, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, मच्छिमार सेलचे दादा केळुसकर, ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब, युवा मोर्चाचे मनोहर तांडेल व भुषण सारंग, मारुती दोडाणशट्टी, संभाजी सावंत, अशोक आरोलकर, संतोष सावंत, संदिप परब इत्यादी उपस्थित होते.